महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोण पटकवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. उपांत्य फेरीत झालेल्या वादानंतर जेतेपदाबाबत बरीच चर्चा रंगली होती. अखेर अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली आणि मानाचा पुरस्कार पटकावला.
Image Credit source: फाईल फोटो
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि सामना जिंकला. पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.