अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण बजेट (Budget 2025)सादर केले आहे. या अर्थसंकल्पातील १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नाला करसवलत दिल्याने मध्यमवर्गाला आनंद झाला आहे. परंतू अनेकांना अर्थसंकल्पातील या तरतूदी कळायला प्रचंड वेळ लागत आहे. अर्थसंकल्प समजण्यासाठी तसा सामान्यांना अवघडच असतो. कारण त्यातील आर्थिक बाबी अनेकांना समजत नाहीत. बँकेचे काम देखील तांत्रिकदृष्ट्या किचकट असते. बँकेची साधी डिपॉझिट स्लीप भरताना अनेकांना इतरांची मदत घ्यावी लागते. अशाच प्रकार एका महिलेने चेकने पैसे काढताना असेही काही लिहीले की ते वाचून कॅशियरला हसावे की रडावे हे कळेना…
बँकेचे काम करणे आणि विविध प्रकारचे बँकेचे अर्ज भरणे मोठे क्लिष्ठ काम असते. त्यातील शासकीय भाषा तर न समजणारी असते. त्याच प्रकारे पोस्टाचे मनी ऑर्डरचे फॉर्म भरणे अशा सरकारी कामासाठी अगम्य भाषेचा वापर केला जातो. ती भाषा वाचूनच आपल्याला नेमका कशासाठी अर्ज करायचा आहे तेच आपण विसरुन जातो. चेक भरायचा असले किंवा डिपॉझिटची स्लीप भरायची असेल तर लोक नेहमीच इतरांची मदत घेतात.
हे सुद्धा वाचा
IDBI बँकेचा चेक व्हायरल
अनेकदा बँकेच्या स्लीपवर उलट सुलट काही लिहीले जाते. त्यानंतर ह्या स्लीप व्हायरल होत असतात. असाच एक धनादेशाचा फोटो व्हायरल होत आहे. कदाचित हा फोटो फेक देखील असावा. इंस्टाग्राम अकाऊंट @smartprem19 वर अलिकडेच IDBI बँकेचा चेक व्हायरल होत आहे. त्यात चेक भरणाऱ्या महिलेचे नाव संगिता असून तिने चेक चुकीच्या पद्धतीने भरला आहे. जेथे पैसे अक्षरात लिहायचे तिथे तीने मजेशीर गोष्ट लिहिली आहे. चेकवर डिसेंबर २०२४ ही तारीख लिहीली आहे.