इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Ferrato ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Defy 22 हिंदुस्थानात लॉन्च केली आहे, कंपनीने याची एक्स शोरूम किंमत 1 लाख रुपये इतकी ठेवली आहे. ही स्कूटर 17 जानेवारी 2025 रोजी सादर करण्यात आली होती. फेराटो ची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी OPG मोबिलिटी मधील नवीन प्रीमियम ब्रँड आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
Ferrato Defy 22 ला एक आकर्षक आणि आधुनिक डिझाइन देण्यात आले आहे, यामुळे ही स्कूटर खूपच आकर्षक दिसते. स्कूटरला 12-इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत, जे याला स्टायलिश लूक देतात. षटकोनी आकाराच्या एलईडी हेडलॅम्पसह याचा फ्रंट अॅप्रन लांब आणि आकर्षक आहे. Ferrato Defy 22 त 7-इंचाचा टचस्क्रीन स्पीडोमीटरही देण्यात आला आहे.
या ईव्हीमध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट्स हे तीन रायडिंग मोड पाहायला मिळतील. यात ड्युअल लेव्हल फूटबोर्ड आणि आरामदायी राइडिंगसाठी 25 लिटरची मोठी बूट स्पेस असेल. यात 12-इंच अलॉय व्हील, कॉम्बी डिस्क ब्रेक सिस्टम, 220 मिमी फ्रंट डिस्क, 180 मिमी रियर डिस्क ब्रेक सिस्टम आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ॲब्जॉर्बर सस्पेन्शन आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 1200W मोटर आहे, ज्याची पॉवर 2500W पर्यंत जाते. याच्या बॅटरी पॅकबद्दल बोलायचे झाल्यास, यात 72V 30Ah (2.2 kWh) LFP बॅटरी आहे. यात IP65 रेटेड वेदरप्रूफ चार्जर आहे. ही स्कूटर 80 किमीची रेंज देऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.