Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवार मॅक्सिको आणि कॅनाडावरुन येणाऱ्या सामानांवर 25 टक्के तर चीनवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावण्याचे आदेश दिले. ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर एक मोठा इशारा दिला आहे. त्यांनी हा इशारा सोने, चांदी आणि बिटकॉइनबाबत दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन त्यांनी हा इशारा दिला आहे.
गुंतवणुकदारांना खरेदीची संधी
अमेरिकेत राहणारे लेखक आणि उद्योजक रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटले की, अमेरिकने राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लावण्यात येणाऱ्या टॅरिफ मोठे नुकसान करणारे असणार आहे. यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण होणार आहे. तसेच सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये घसरण होऊ शकते. मात्र, जे खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही घसरण चांगली संधी ठरू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. जेव्हा किंमत कमी होईल तेव्हा ते खरेदी करणे चांगले होईल.
शेअर बाजारात घसरणीचा दिला होता इशारा
कियोसाकीने X वर आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ट्रम्प टॅरिफ सुरू झाल्यामुळे आता सोने, चांदी, बिटकॉइन पडू शकतात. गुंतवणुकदारांसाठी हे चांगले आहे. त्यांना किंमती कमी झाल्यानंतर खरेदीची संधी आहे. परंतु खरी समस्या कर्जाची आहे. जी आणखी बिकट होईल. मात्र गुंतवणुकदारांना श्रीमंत होण्याची वेळ आली आहे. कियोसाकी यांनी यापूर्वीही भाकीत केले होते. त्यांनी शेअर बाजाराबाबत इशारा दिला होता. शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण फेब्रुवारीमध्ये दिसून येईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर बाजारात घसरण दिसून आली.
हे सुद्धा वाचा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या मालावर 25% शुल्क लागू केले आहे. तर चीनमधून आयातीवर 10% शुल्क लावण्यात आले आहे. हा दर एक फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. हे शुल्क तीन देशांमध्ये अवैध स्थलांतर आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आहे.