Published on
:
01 Oct 2024, 6:58 am
Updated on
:
01 Oct 2024, 6:58 am
जुलै महिन्यात देशात सुमारे ११ लाख युवांना रोजगार उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) संघटनेतील वेतनधारकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रोजगारवृद्धीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नवीन नोकरदारांमध्ये युवकांसह महिलांचाही समावेश आहे.
जॉब मार्केट अनुषंगिक धोरणांचा परिणाम
केंद्र सरकारकडून रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. जॉब मार्केट अनुषंगिक धोरणे राबविण्यात येत असल्याचा हा परिणाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुलै महिन्यात १० लाख ५२ हजार जणांना नवीन रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये २.४३ टक्के वाढ झाली आहे.
ईपीएफओच्या पे रोलमध्ये जुलै महिन्यात १९.९४ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये २.६६ टक्के जादा रोजगार उपलब्ध झाले आहेत.
जुलै महिन्यात प्रथमच नोकरीसाठी रुजू झालेल्या तरुणांची संख्या ६ लाख २५ हजार आहे. ५९.४१ टक्के युवकांना नवीन नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.
दोन वर्षातील पे रोलवरील नोकरदार
२०२२-२३: १३८.५२ लाख
२०२३-२४: १३१.४८ लाख
जुलै महिन्यात ८ लाख ७७ हजार युवांना रोजगार उपलब्ध झाला आहे.