Power supply: दणका देशोन्नतीचा…अखेर कनिष्ठ अभियंता यांनी लाईनमनला बजावले नोटीस  

1 hour ago 1

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Power supply) :  गेल्या दोन महिन्या पासून रूजू झालेले लाईनमन सरकटे हे गावकऱ्यांना कामामध्ये निष्काळजी पणाची सेवा देत असल्याने (Power supply) विद्युत पुरवठा वारंवार विस्कळीत होत त्यांमध्ये गावकऱ्यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे दै. देशोन्नती मध्ये लाईनमनचा मनमानी कारभार अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती बातमी प्रकाशित होताच तात्काळ कनिष्ठ अभियंता पडघान यांनी लाईनमन सरकटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील ३३ केव्हीं उपकेंद्रा अंतर्गत २० ते २५ गावामध्ये गावकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा व मिळावा यासाठी कनिष्ठ अभियंता पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली १५ लाईनमन कर्मचारी काम करतात. त्यामध्ये गेली सात वर्ष गुंजाळा व मनूबाई या दोन्ही गावांना रात्र दिवस सेवा देणारे लाईनमन भगत यांनी शंभर टक्के वसुली करून गावात दररोज गावकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास तत्पर राहत होते.

मात्र अचानक यांची प्रशासकिय बदली झाली. आणि त्यांच्या जागेवर लाईनमन म्हणून सरकटे हे रूजू झाले. मात्र सरकटे हे रूजू झाल्यापासून गावात केव्हा येतात आणि केव्हा गावातून निघून जातात हेच लोकांना माहीत नाही त्यामुळे गावकऱ्यांना लाईनमन कोण आहे हेच माहीत नाही. तसेच गावाच्या शंभर टक्के वसुलीला ब्रेक बसला आहे . लाईनमन गावात वेळेवर येत नसल्याने गावाचा वारंवार विद्युत पुरवठा (Power supply) विस्कळीत होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. विस्कळीत होत असलेल्या विद्युत पुरवठयामुळें घरगुती उपकरणे केव्हा जळतील याची भीती निर्माण झाली आहे.

एकीकडे गावकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा (Power supply) मिळावा तसेच लोकांची गैरसोय होऊ नये. यासाठी शासनाने मेरा खुर्द येथे मुख्यालयी राहण्यासाठी मोठी वसाहत बांधून ठेवली आहे मात्र या वसाहती मध्ये कर्मचारी राहत नसून त्याचा वापर जनावरे बांधण्यासाठी केला जात आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेवून गुंजाळा व मनुबाई गावांसाठी तत्पर सेवा देणारा लाईनमन कर्मचारी यांची नेमणूक करावी अथवा लाईनमन सरकटे यांना काम करण्याची ताकीत द्यावी, अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती बातमी प्रकाशित होताच तात्काळ कनिष्ठ अभियंता पडघान यांनी लाईनमन सरकटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि लोकांना सेवा द्या कामात पारदर्शकता ठेवा , कोणाची तक्रार येणार नाही याचा काळजी घ्या असे सुनावले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article