Published on
:
07 Feb 2025, 7:04 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:04 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसुंधरा तनयाला गृह कर्तव्यदक्ष बनवण्यासाठी मुद्दाम कठीण प्रसंग घडवून आणतेय, म्हणून ती तनयाला मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायला लावते, हाताने कपडे धुवायला सांगते आणि एक परिपुर्ण गृहिणी व्हावी यासाठी तिच्यावर दबाव टाकते. तनया मन मारून हे सगळं करते, पण आपली संपूर्ण चिडचिड विशालवर काढते. थकून-भागूनही तनयाने एकटीनेच सर्व काही करण्याचा हट्ट धरते. दुसरीकडे, अवनी भास्करला मोठी स्वप्ने पाहायला लावते, त्याला फक्त हुकूमाचे पालन करणारा माणूस न राहता, स्वतःचं स्थान निर्माणकरण्यासाठी प्रयत्न करायला सांगते. तनया वसुंधराकडून बारकावे शिकण्याचा प्रयत्न करतेय.
तनया वसुंधराच्या आणि घरातल्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय. पण या सततच्या तणावामुळे आणि निराशेच्या भरात तनया विशालसोबत वसुंधराला तोंड देण्याची योजना आखते. पण तणावामुळे आणि थकव्यामुळे ती बेशुद्ध पडते. डॉक्टर तनया गरोदर असल्याचं आणि तिला विशेष काळजी घ्यावी लागेल असं सांगतात.
संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. याचा फायदा घेत तनया वसुंधराला ती जी काम करत होती ती सगळी काम करण्यास भाग पाडते. ती वसुंधराला स्वतःच्या खोलीबद्दल माफी देखील मागायला लावते. ही दोघींमधली जुगलबंदी आता नव्या टप्प्यावर पोहोचणार आहे. जिथे वसुंधरा आणि तनया दोघीही कोण झुकतंय हे सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. काय आहे तनयाचा हा नवा प्लान? वसुंधरा, तनया समोर झुकणार का? तनया खरंच गरोदर असेल? यासाठी 'पुन्हा कर्तव्य' सोम- शनि संध्या. ६ वा. झी मराठीवर पाहा.