वाहतुकीचे नियम मोडणार्या चालकांना 24 लाखांचा दंडPudhari
Published on
:
28 Nov 2024, 5:23 am
Updated on
:
28 Nov 2024, 5:23 am
न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्या वतीने अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहन चालकांना रहदारीची शिस्त लावण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहन चालकांवर उरण वाहतूक आणि न्हावा शेवा वाहतूक विभागाने विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करीत नोव्हेंबरमध्ये लाखो रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे.
चालू महिन्यात विशेष मोहीम आखून आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण 2 हजार 450 वाहन चालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहन चालकांना एकूण 24 लाख 50 हजार इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.
न्हावा शेवा वाहतूक विभागाच्या कारवाईअंतर्गत नोव्हेंबर 2024 विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणार्या 950 चालकांविरुद्ध, तसेच रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी चार चाकी व अवजड वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या 1 हजार 250 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. उरण वाहतूक विभाग अंतर्गत नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण केसेस 3 हजा 37 करण्यात आल्या आहेत. यामध्ये हेल्मेट, सिटबेल्ट, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, राँग साईट ट्रिपल सीट अशा कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण दंड 27 लाख 86 हजार 750 रुपयाचा आकरण्यात आला आहे. तसेच ड्रंक अँड ड्राइव्हच्याही एकूण 6 केसेस करण्यात आल्या आहेत. उरण जेएनपीटी तसेच उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर आणि उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी केले आहे.
पोलीसांनी अवैध वाहतूकीवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली तर बेकायदा वाहनचालकांना चाप बसू शकतो.
कायद्याचे पालन करा- पोलीस
उरण जेएनपीटी तसेच उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर आणि उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी केले आहे.