मला पाडण्याची राणा दाम्पत्यांची औकात नाही:हिंमत असेल तर माझ्याविरोधात अपक्ष लढून दाखवा, बच्चू कडूंचा घणाघात

3 hours ago 2
विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघातून पराभव झाला. रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यांमुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर बच्चू कडू यांनी उत्तर देत राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे. माझ्या पराभवाचे श्रेय त्यांनी घेऊ नये. मला पाडण्याची राणा दाम्पत्यांची औकात नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सुनावले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यंदा महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. अचलपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बच्चू कडू यांच्या पराभवाचे श्रेय त्यांचे विरोधक घेत आहेत. राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडुंचा पराभव झाला, अशा चर्चा आहेत. यावरून बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले. ...तर माझ्या पराभवाचे श्रेय दिले असते बच्चू कडू म्हणाले, राणा दाम्पत्यांनी माझ्या पराभवाचे श्रेय घेऊ नये. यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे असते, अन् मी पडलो असतो, तर मग माझ्या पराभवाचे श्रेय त्यांना दिले असते. पण, सध्यातरी त्यांनी माझ्या पराभवाचे श्रेय घेऊ नये. बच्चू कडू को हमने गिराया असे ते म्हणतात. पण, मला पाडण्याची त्यांची औकात नाही, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. त्यांच्यात हिंमत असेल, तर माझ्याविरोधात कुठलीही निवडणूक अपक्ष लढवून दाखवावी, असे आव्हानही बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिले. रवी राणांचा निवडणुकीत मोठा विजय विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा 12 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. बच्चू कडू हे सलग 4 वेळा अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मात्र, यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे बच्चू कडूंचे विरोधक आणि राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचा बडनेरा मतदारसंघातून मोठा विजय झाला. रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला होता. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रिती बंड यांचा पराभव केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article