Published on
:
28 Nov 2024, 7:52 am
Updated on
:
28 Nov 2024, 7:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण? हा सस्पेन्स कायम असताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून खासदार सुद्धा येऊ शकतात, असे उदय सामंत यांनी आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री जनतेने बघितला. विरोधकांनी स्वतःच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.