Ratan Tata : रतन टाटा यांचं निधन, पंतप्रधान मोदी, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

2 hours ago 1

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली होती. अखेर बुधवारी रात्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, नितीन गडकरी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, पियुष गोयला यांसारख्या अनेक दिगज्जांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व प्रदान केले’असे त्यांनी नमूद केले.

Shri Ratan Tata Ji was a visionary concern leader, a compassionate psyche and an bonzer quality being. He provided unchangeable enactment to 1 of India’s oldest and astir prestigious concern houses. At the aforesaid time, his publication went acold beyond the boardroom. He endeared… pic.twitter.com/p5NPcpBbBD

— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024

सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे – शरद पवार यांनीही वाहिली श्रद्धांजली

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून रतन टाटा यांना आदरांजली वाहिली. ‘जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! ‘ असे पवार यांनी लिहीलं.

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून…

— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 9, 2024

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article