टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. सलामीचा सामना हा पर्थ येथे होणार आहे. रोहित शर्मा याच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा या मालिकेत समावेश करण्यात आला नाही. ऋतुराज टीम इंडिया ए संघात होता. त्यामुळे ऋतुराजला मुख्य संघात संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र त्याचा समावेश करण्यात आला नाही. मात्र त्यानंतरही ऋतुराजला टीमकडून मोठी जबाबदारी मिळाली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीबाबत थोडक्यात
भारतात 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 135 सामने होणार आहेत. या स्पर्धेसाठी 19 नोव्हेंबरला महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समिताने 18 सदस्यीय संघ जाहीर केला. ऋतुराज या 18 सदस्यीय संघाचं नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्र एकूण 6 सामने खेळणार आहे. महाराष्ट्र समोर पहिल्याच सामन्यात नागालँडचं आव्हान असणार आहे. तर 27 नोव्हेंबरला मुंबई विरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र संघाचं वेळापत्रक
महाराष्ट्र विरुद्ध नागालँड, शनिवार 23 नोव्हेंबर
महाराष्ट्र विरुद्ध केरळ, सोमवार 25 नोव्हेंबर
महाराष्ट्र विरुद्ध मुंबई, बुधवार 27 नोव्हेंबर
महाराष्ट्र विरुद्ध आंध्र, शुक्रवार 29 नोव्हेंबर
महाराष्ट्र विरुद्ध गोवा, मंगळवार 3 डिसेंबर
महाराष्ट्र विरुद्ध सर्व्हिसेस, गुरुवार 5 डिसेंबर
ऋतुराज गायकवाड याच्याकडे महाराष्ट्रचं नेतृत्व
🏏 Presenting the Maharashtra Squad for the Syed Mushtaq Ali Trophy 2024-25! 💪 Led by our dynamic skipper Ruturaj Gaikwad, this squad is acceptable to shine! 🌟#maharashtracricket #teammaharashtra #cricket #SMAT2024 pic.twitter.com/VrFPHLa4mc
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) November 19, 2024
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अंकीत बावणे, अर्शीन कुलकर्णी, राहुल त्रिपाठी, निखील नाईक (विकेटकीपर), धनराज शिंदे (विकेटकीपर), दिव्यांग हिंगेकर, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अर्थव काळे, सिद्धार्थ म्हात्रे, सत्यजीत बच्छाव, राजवर्धन हंगरगेकर, अझीम काझी, रुषभ राठोड आणि सन्नी पंडीत.