Samsung Galaxy S25 सीरीज AI फीचर्स आणि 12GB RAM सह झाली लॉन्च, जाणून घ्या किंमत

5 hours ago 1

स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आज आपली बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Samsung Galaxy S25 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra असे तीन मॉडेल आहेत. कंपनीने या सीरिजमध्ये अनेक एआय फीचर्स दिले आहेत. याशिवाय कंपनीने या स्मार्टफोन्समध्ये 12GB रॅम देखील दिली आहे.

Samsung Galaxy S25 आणि S25+ स्पेसिफिकेशन्स

कंपनीने Samsung Galaxy S25 मध्ये 6.2 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच कंपनीने S25+ मध्ये 6.7 इंचाचा QHD+ डिस्प्ले दिला आहे. दोन्ही मॉडेल्सचे डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. कंपनीने हे दोन्ही मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट SoC वर आधारित प्रोसेसरवर लॉन्च केले आहेत.

कॅमेरा सेटअप

याच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह 10MP 3x टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सर दिला आहे. कंपनीने सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी यात 12MP फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे.

पॉवरसाठी Samsung Galaxy S25 मध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर कंपनीने S25+ मध्ये 4900mAh बॅटरी दिली आहे. हे मॉडेल Android 15 One UI 7 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. कंपनीने 12+128GB, 12+256GB, 12+512GB अशा तीन प्रकारांमध्ये Samsung Galaxy S25 लॉन्च केला आहे. तर Samsung Galaxy S25+ फक्त दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 12+256GB आणि 12+512GB चा समसेश आहे. कंपनीने हे दोन्ही मॉडेल पिंक गोल्ड, ब्लू ब्लॅक, सिल्व्हर शॅडो, कोरल रेड, मिंट, नेव्ही आणि आइसी ब्लू या रंगांसह बाजारात आणले आहेत. याशिवाय हा फोन IP68 रेटिंगसह येतो. म्हणजेच हा फोन पाणी आणि धुळीनेही खराब होत नाही.

Samsung Galaxy S25 अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स

या सीरिजच्या Galaxy S25 अल्ट्रा मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या मॉडेलमध्ये 6.9 इंचाचा क्वाड HD+ 2x डायनॅमिक AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय हे मॉडेल Qualcomm Snapdragon 8 Elite SoC वर आधारित प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने हा फोन 12+256GB, 12+512GB आणि 12+1TB अशा तीन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. हे मॉडेल Android 15 वर आधारित One UI 7 ऑपरेटिंग सिस्टमवर देखील काम करेल.

कॅमेरा सेटअप

यात 50MP टेलिफोटो लेन्स सोबत 200 MP प्राइमरी कॅमेरा दिला आहे. जो 5x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. या व्यतिरिक्त यात 10MP 3x टेलीफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्स देखील आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 12MP चांफ्रंट कॅमेरा आहे.

किती आहे किंमत

किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung ने Galaxy S25 च्या 12GB + 128GB व्हेरिएंटची यूएसमध्ये किंमत 799 डॉलर्स (69,000 रुपये) ठेवली आहे. तर याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 859 डॉलर्स (74,300 रुपये) आहे. याशिवाय Galaxy S25 + च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 999 डॉलर्स (86,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. यातच Galaxy S25 Ultra च्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत 1299 डॉलर्स (1,12,300 रुपये), 16GB + 512GB मॉडेलची किंमत 1419 डॉलर्स (1,22,700 रुपये) आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article