Published on
:
24 Jan 2025, 11:45 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:45 pm
सातारा : सातारा शहर परिसरात अवघ्या साडेपाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रवीण श्रीरंग मोरे (वय 30, रा. मोरेवाडी ता.सातारा) या नराधमावर शाहुपूरी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 19 जानेवारी रोजी घडली आहे. अल्पवयीन मुलगी खेळत असताना संशयित प्रवीण मोरे याने पाहिले. मुलगीजवळ कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीला टेरेसवर नेले. तेथे त्याने अत्याचार केला असता मुलगी रडू लागली. संबंधित घटनेची माहिती कोणाला देवू नको, असे म्हणत मुलीला धमकावले. या घटनेशिवाय इतरवेळीही मुलीचा विनयभंग केला. या सर्व घटनेने मुलगी घाबरुन गेली होती. मुलीच्या आईने मुलीला बोलते केल्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती तिने दिली. यानंतर मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. पोलिसांनी त्यानुसार संशयिता विरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.