भगर खाल्ल्याने 52 भाविकांना विषबाधा:माहूर शहरातील ठाकूर बुवा यात्रेमधील प्रकार, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

21 hours ago 2
नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात ठाकूर बुवा यात्रेमध्ये भगर खाल्ल्याने 52 भाविकांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सर्व भाविकांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रूग्णांची प्रकृर्ती स्थीर असून कोणत्याही प्रकारची चिंताजनक बाब नसल्याचे प्रशासनाच्या वतीने तहसिलदार किशोर यादव यांनी सांगितले आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, तिर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात ठाकूर बुवा यांची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पायी दिंड्या शहरात दाखल होतात आणि मोकळ्या जागेत, विविध मठात, मंदिर परिसरात राहुट्या उभारतात. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा येथूनही एक दिंडी देवदेवेश्वर परिसरात शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली होती. दरम्यान काल दि. 25 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिंडीतील भाविकांसाठी त्यांनी फराळासाठी भगर केली होती. ती दिंडीतील जवळपास सर्वच भाविकांनी खाल्ली. परंतू रात्री बारानंतर भगर खालेल्या बहुतांश भाविकांना मळमळ व उलटीचा त्रास होवू लागल्याने मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्यांना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्यासह माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवप्रकाश मुळे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी आदींनी रुग्णांची भेट घेवून विचारपूस केली. दरम्यान सर्व रूग्णाची प्रकृर्ती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे प्रसासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सांगलीत शासकीय निवासी शाळेतील 23 विद्यार्थ्यांना विषबाधा 7 दिवसांपूर्वीच विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील शासकीय निवासी शाळेतील 23 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विटा येथे समाजकल्याण विभागाची शासकीय निवासी शाळा आहे. तेथे 93 विद्यार्थी आहेत. त्यांना दुपारी मांसाहारी जेवण व सायंकाळी दूध व कलिंगड असा आहार दिला. रात्री चपाती, आमटी व भात असे जेवण देण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा जुलाब आणि उलट्या होउ लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रकारात वाढ झाली. पोटदुखीही सुरू झाली. त्यामुळे त्यांना अन्नातून विषबाधेची शंका आल्याने शाळा प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article