Sanjay Raut : ‘आमदारांना गुंगीच औषध देऊन बधीर करण्याचा प्रयत्न’, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

2 hours ago 1

“वोट जिहादवर आरएसएस, भाजपा फेक नरेटिकव्ह सेट करतय. वोट जिहाद काय असतं? त्यावर श्वेतपत्रिका काढावी लागेल. भाजपा निवडणूक हरले की वोट जिहाद, एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी मतदान केलं की, वोट जिहाद नाही का?” असं सवाल संजय राऊत यांनी वोट जिहादवर विचारला. “या देशात सगळ्या जाती धर्माचे मतदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांचा मतदानाचा अधिकार काढलाय का? कोणाला मतदान करायचा हा त्यांचा अधिकार. 2014 आणि त्याआधी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने मोदींना मोठ मतदान केलं होतं. तुम्ही आकडे पाहा, त्याला काय म्हणालं” असं संजय राऊत म्हणाले.

“जेव्हा मुस्लिम समाजाने मोदींना मतदान केलं, त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील, तेव्हा वोट जिहाज नाही. भ्रमनिरास झाल्यावर तुमच्या विरोधात मतदान केलं, तेव्हा तो वोट जिहाद. तुम्ही कोणतं नरेटिव्ह सेट करताय” असं संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाचे आमदार नितिन देशमुख यांनी सूरतमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप केला. त्यावर सुद्धा संजय राऊत बोलले आहेत.

‘आमदारांना गुंगीच औषध देऊन बधीर करण्याचा प्रयत्न’

“हो, जवळजवळ तसाच प्रयत्न झाला. अनेक आमदार आहेत, ज्यांना गुंगीच औषध देण्यात आलं. बधीर करण्यात आलं. नितिन देशमुख तिथून पळून आले. आमचे अजून आमदार आहेते जे तिथे गेल्यावर गुंगीमध्ये होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांकडे होता. आमदार खासगीमध्ये सांगतात, खाण्यातून, पेयातून काहीतरी दिलं जात होतं. सात-आठ दिवस काय चाललय ते कळत नव्हतं. काही आमदारांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. पण आता हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत” असं संजय राऊत म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article