सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी बीड कारागृहात सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची ओळखपरेड केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे. त्याची माहिती देणाऱयास बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. अशातच आता अटकेतील चार आरोपींची ओळखपरेड केली जाणार आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणाशी कराड यांच्या मुलांचे कनेक्शन
महादेव मुंडेंचा खून झाला या कालावधीत वाल्मीक कराड यांची मुलं सुशील आणि श्री यांचे फोन पोलीस अधिकारी सानप यांना गेले होते. वाल्मीक कराडच्या दोन्ही मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे या सहा जणांना 150 वेळा फोन केले. महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा यांच्या घरातून फोन का जातात? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी करत महादेव मुंडे खून प्रकरणात कराड यांच्या मुलांचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला.
कारवाई होत नसल्याने संशय – धनंजय देशमुख
मला यंत्रणेवर शंका येत आहे. त्याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना मिळतात. मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? असे प्रश्न उपस्थित करून तपास यंत्रणेने आतापर्यंत काय केले, याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केज येथे केली.