वरंध घाटात रात्री मालवाहतूक ट्रक अडकलाFile Photo
Published on
:
26 Jan 2025, 5:46 am
Updated on
:
26 Jan 2025, 5:46 am
महाड : पुढारी वृत्तसेवा
महाड औद्योगिक वसाहत व महाड मधील व्यवसायासाठी येणारा एक मालवाहतूक ट्रक वरंधा घाटात एका वळणावर अडकल्याची घटना घडली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मार्फत या घटनेसंदर्भात कार्यवाहीसाठी रवाना झाल्याची माहिती देण्यात आली.
या विषयी मिळालेला प्राथमिक वृत्तानुसार शनिवार रात्री उशिरा हा ट्रक पुणे परिसरातून माल भरून महाडकडे येत होता असे सांगण्यात आले आहे. माझेरी व वाघजाई मंदिराच्या मध्यावर असलेल्या एका वळणावर हा ट्रक असल्याचे सांगण्यात आले. चालकाने कौशल्याने प्रसंगावधान राखून गाडीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.
याबाबत सविस्तर वृत्त महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाले. रात्री उशिरा ही घटना घडल्याने या संदर्भातील गाडीचा चालक अथवा गाडी मधील मालका संदर्भात माहिती प्राप्त होऊ शकली नाही.