Sania Mirza: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सानियाने काही वर्षांपूर्वी टेनिसमधून संन्यास घेतला. पण असं असताना देखील सानिया कोट्यवधींमध्ये माया कमावते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिची चर्चा रंगली आहे.
टेनिसचं मैदान गाजवल्यानंतर सानिया आता नव्या भूमिकेत दिसत आहे. सानिया आता टीव्ही प्रेजेंटरच्या भूमिकेत दिसत आहे. सानियाला पाहून असं वाटत आहे की तिला नोकरी मिळाली आहे. पण असं काहीही नाही. सांगायचं झालं तर, खेळाडू निवृत्त झाल्यानंतर प्रेजेंटर म्हणून काम करतात.
सानिया हिची स्वतःची एक टेनिस अकॅडमी आहे. अकॅडमीच्या माध्यमातून अभिनेत्री उत्तम कमाई करते. सध्या सानिया मुलासोबत दुबई याठिकाणी राहत आहे. सानिया आता टेनिस विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सानियाच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, सानियाने टेनिस खेळून 52 कोटी रुपये कमाई केली आहे. जाहीरातीमधून ती दरमहिन्याला कोट्यवधी रुपये कमविते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी तिला 50 ते 60 लाख रुपये मिळतात. तिची संपत्ती 200 कोटी रुपये आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सानिया कमाई करते.
सानियाला खेळातून वार्षिक तीन कोटी रुपये आणि जाहीरातीतून 25 कोटी रुपये मिळतात. हैदराबाद येथे तिचे आलिशान घर आहे. ज्याची किंमत 13 कोटी आहे. सानियाने हे घर साल 2012 मध्ये विकत घेतले होते. सानिया टेनिक अकादमी चालविते. तिचा दुबईतील एका बेटावर आलिशान बंगला आहे.
सानियाचं कार कलेक्शन
सानिया मिर्झा हीच्या गॅरेजमध्ये आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. सानियाकडे बीएमडब्ल्यू एक्स 3 आणि एक पोर्श carrera GT देखील आहे. त्याशिवाय मर्सिडीज, जग्वार एक्सई, बीएमडब्ल्यू 7 – सिरीज , ऑडी, मर्सिडीज बेंज आणि रेंज रोव्हर सारख्या गाड्या आहेत. सानिया तिच्या मुलासोबत रॉयल आयुष्य जगते.