जरांगेंची प्रकृती खालावली; बोलताही येईना. धनंजय देशमुखांकडून सरकारला अल्टिमेटम, म्हणाले उद्याच्या उद्या…

1 day ago 3

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शनिवारी २५ जानेवारी २०२५ पासून पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले आहेत. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. त्यातच आता बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत.

धनंजय देशमुख हे नुकतंच आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. मनोज जरांगेंची प्रकृती खूप खालावत आहे. त्यांना बळ द्यावा. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मी विनंती करतो. सरकारने गांभीर्यपूर्वक याची दखल घेतली पाहिजे. उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने त्या मान्य कराव्यात, असे धनंजय देशमुख म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे…

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article