वाखरी पालखी तळापासून इसबावी विसाव्यापर्यंत सर्व्हिस रस्त्याची गरज:प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

1 day ago 1
पालखी महामार्ग बायपास ते पंढरपूर या विस्तारित पालखी महामार्गाचे काम सुरू असताना अनेक त्रुटी समोर येत आहेत, त्या त्रुटी दूर कराव्यात अन्यथा भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील असे दिसून येत आहेत. वाखरी पालखी तळ ते वाखरी आणि तिथून इसबावी विसावा पर्यंत सर्व्हिस रोडची गरज व्यक्त होत आहे. वाखरी ग्रामस्थांनी मागणीसाठी गावाजवळचे काम गेल्या दोन महिन्यापासून बंद पाडले आहे. शिवाय टाकळी ते वाखरी या बायपास मार्गाला वाखरीकडून येणाऱ्या वाहनांना कनेक्ट मिळत नाही,त्यामुळे यात्रा या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विस्तारित पालखी महामार्गाचे काम गेल्या १५ महिन्यांपासून या मार्गाचे काम सुरू आहे. ठेकेदाराच्या मनमानी पणामुळे तसेच कामाच्या कूर्मगतीमुळे अगोदरच वाखरी आणि इसबावी येथील नागरिक हैराण झालेले आहेत. त्यातच आता रस्त्याचे काम पुढे जाईल तसे त्यातील त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. या मार्गावर वाखरी पालखी तळाजवळ ९ फुटांचा दुभाजक टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे याठिकाणी यात्राकाळात भाविकांना दुभाजक पार करून जाणे जिकिरीचे ठरणार आहे. तसेच पालखी तळ ते वाखरी दरम्यान या मार्गाला कुठेही सर्व्हिस रास्ता सोडलेला नाही. त्यामुळे वाखरी, इसबावी येथील दोन्ही बाजूच्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. वाखरी येथून शेकडो विद्यार्थी आश्रम शाळेत शिक्षणासाठी ये-जा करतात सर्व्हिस रोड नसल्याने या विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. वाखरी गावची वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी विचारात घेऊन पालखी तळ ते इसबावी विसावापर्यंत ९ फूट रुंदीच्या दुभाजकाऐवजी बाजूला सर्व्हिस रोड असावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे. याच मागणीसाठी वाखरी गावठाणाजवळ गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. पालखी तळ ते वाखरी गाव सर्व्हिस रोड दिल्याशिवाय काम असा निर्धार ग्रामस्थांनी केलेला आहे. मात्र प्रशासन ऐकायला तयार नाही. टाकळी बायपासला अडचणीचा कनेक्ट टाकळी ते वाखरी या नवीन बायपास मार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र पुणे - सातारा बाजूने येणाऱ्या वाहनांना वाखरी येथील पुलावरून आल्यानंतर उजव्या बाजूला यू टर्न वळण घेऊन टाकळी बायपास मार्गे पुढील प्रवास करावा लागणार आहे. मात्र याच बायपासला मारुती मंदिराजवळ मिळणारा कनेक्ट चुकीचा असून या ठिकाणी यात्राकाळात वाहनांची कोंडी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जोड मार्गाची गरज आहे. ^पालखी तळापासून ते वाखरी आणि पुढे इस्बावी पर्यंत रस्त्याच्या मध्ये तीन मीटरचा दुभाजक सोडलेला आहे, मात्र स्थानिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व्हिस रोड सोडलेला नाही, गावच्या जवळ ओढ्यावरील पुलाचे काम करताना जुना मार्ग सर्व्हिस रोड म्हणून ठेवण्याची गरज आहे, अन्यथा वाहनाची गैरसोय होणार आहे, टाकळी बायपास चौकात पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना यू टर्न घेऊन परत यावे लागते आणि बायपासला जावे लागते. हे अडचणीचे ठरणार आहे. संग्राम गायकवाड, माजी उपसरपंच वाखरी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article