काल दुपारी सभागृहात शिक्षक संघटना फिरकल्या नाहीत. तर ग्रामसेवक, आरोग्य, पशुवैद्यकीय संघटनांनी मात्र बैठकीला आवर्जून हजेरी लावल्याचे दिसले. सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह कॅफो शैलेश मोरे, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, कृषी विकास अधिकारी शिंदे, बांधकाम दक्षिणचे कार्यकारी अभियंता सागर, कार्यकारी अभियंता नन्नावरे आदी उपस्थित होते.
यावेळी राहुल शेळके यांनी पदोन्नती, आश्वासत प्रगती योजना यासह अन्य प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करताना संघटनांना विश्वासात घेतल्याचे दिसले. तर ग्रामसेवक, पशुवैद्यकीय, आरोग्य संघटनेने ‘क्यू आर’ सक्ती का नको, याची कारणे सांगितली.
मात्र, शेळके यांनी ‘मुख्यालयी राहता का’ या एकाच प्रश्नातून निम्मा विरोध संपवला. शिवाय अन्य मुद्देही खोडून काढल्याचे दिसले. क्यू आर बेस्ड हजेरी रद्द होणार नाही, त्यावरच दररोज हजेरी नोंदवावी, जानेवारीचा नव्हे तर यापुढील पगार याच हजेरीनुसार काढले जाणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.