महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या, व्हायरल व्हिडीओवर विरोधक संतापले

5 hours ago 2

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर टीका करत आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाठणा येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर अचानक नितीश कुमार टाळ्या वाजू लागले. त्यांना बिहार विधानसभेचे सभापती नंदकिशोर यादव यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. याचाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओवरून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले आहेत की, ”निती शकुमार हे संघाचे मनापासून भक्त आहेत. त्यांची मानसिक स्थिती राज्य चालवण्यास योग्य नाही, हे या घटनेवरून दिसून येत नाही का? दसऱ्याच्या दिवशी आयोजित रावण दहन कार्यक्रमातही त्यांनी धनुष्यबाण फेकले होते. नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यावेळी त्याची मानसिक स्थिती अशी होती की, त्यांना वाटले धनुष्य बाणाऐवजी कोणीतरी त्याच्या हातात साप ठेवला आहे, म्हणून त्यांनी ते अचानक फेकून दिलं.”

ये देखिए, आपको खुद पता लग जाएगा कि क्यों प्रशांत किशोर जी ने नीतीश कुमार की मानसिक स्थिति पर सवाल खड़े किए थे ।। और मुख्यमंत्री जी के बेहतर उपचार जल्द से जल्द करने की मांग की थी ।।

वीडियो आज का है , जब मुख्यमंत्री जी बापू को उनके पुण्य तिथि पर श्रद्धांजली देने गए थे , तब अचानक… pic.twitter.com/5aHO9VQNgD

— Aman Singh (@Amanmagahi) January 30, 2025

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article