सत्तेच्या जोरावर पालिका निवडणुका टाळल्या जात आहेत, वडेट्टीवार यांचा आरोप

3 hours ago 2

महायुतीचे सरकार लोकांच्या मनातील नाही. निकालात काहीतरी गडबड झाली असेल याची शंका प्रत्येकालाच आहे. आता जनता पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट बघत आहे. मात्र स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आपली जिरवली जाईल, अशी भीती महायुती सरकारला वाटत आहे. त्यामुळे सत्तेच्या जोरावर ‘तारीख पे तारीख’ करून निवडणुका टाळल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. मतदारही याची वाट बघत आहेत. 50 हजार ओबीसींच्या जागा आहेत. त्यांना त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या सुनावणीच्या तारखा आतापर्यंत तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका पुढे जाण्यामागे महायुती सरकारच असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article