महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तयार करावे:बाभूळगाव शहर शिवसेनेची मागणी
2 hours ago
2
शहरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामध्ये शेकडो विद्यार्थी-विद्यार्थ िनी शिक्षणासाठी येतात. दररोज विद्यालये सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळांमध्ये रस्त्यांवर, बसस्थानकामध्ये प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होताना दिसून येते. अशावेळी बसस्थानक व परिसरामध्ये चिडीमारीचे प्रकार होतात. त्याचप्रमाणे रस्त्यावरून विद्यार्थिनी जाताना दुचाकीस्वार भरधाव वाहने चालवून त्यांना त्रास देताना दिसून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तयार करावे, बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलिस शिपाई नियुक्त करावे, या मागणीचे निवेदन बाभूळगाव शहर शिवसेनेच्या वतीने ठाणेदारांना गुरुवारी ३० जानेवारी रोजी देण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी यांनी निवेदन स्वीकारले. एसटी बसस्थानकात विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त बाहेरील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर जास्त झालेला आहे. बसस्थानकाच्या उत्तरेकडील भिंतीशेजारी अनेक वाहनधारक आपल्या चारचाकी वाहनांची अवैधरित्या पार्कींग करत आहेत. या वाहनांचा आडोसा घेवून विद्यार्थिनींशी काही असामाजिक प्रवृत्तीचे युवक असभ्य वर्तवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून समाजात एखाद्या वाईट घटनांकडे संकेत करतो. त्यामुळे बसस्थानकामध्ये कायमस्वरूपी पोलिस शिपायाची नेमणूक करावी. दामिनी पथक तयार करावे. जेणेकरून बाभूळगाव शहरात शिक्षणासाठी व कामानिमित्त येणा-या विद्यार्थिनी, महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर शहर प्रमुख प्रविण लांजेकर, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र काळे, नगरसेवक अभय तातेड आदींच्या सह्या आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)