सांगलीत चाललंय काय? महिन्यात चार खून

2 hours ago 2

सांगली ः नवीन वर्षाची सुरुवातच खुनाच्या घटनेने झाली अन् जिल्ह्यात नेमकं चाललयं काय? असा प्रश्न सार्‍यांनाच पडला. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यात चार खुनाच्या घटना घडल्या असून दोन महिलांवर खुनीहल्ले झाले. कुठे पन्नास रुपयांच्या स्क्रीनगार्डसाठी, तर कुठे जेवण उशिरा बनविले म्हणून तरुणांचे मुदडे पडले. धमकी, खुनीहल्ले आणि खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरला असून पोलिसांचा वचक संपल्याचे चित्र आहे. त्यातच खुनाच्या घटनांत अल्पवयीन मुलांच्या सहभागामुळे चिंता वाढली आहे. जिल्हा भयमुक्त कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

जिल्ह्यात गेल्या महिन्यात खुनाच्या घटनांत वाढ झाली आहे. महिन्याभरात चार खून झाले, तेही तरुणांचे. सांगलीतील बसस्थानक परिसरात शंभर रुपयांचे मोबाईल स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा अल्पवयीन मुलांनी चाकू आणि कोयत्याने सपासप वार करत विपुलपुरी अमृतपुरी गोस्वामी (वय 19) याचा खून केला, तर त्याच्या चुलतभावावर कोयत्याने वार करण्यात आला. तसेच कुपवाड एमआयडीसीत जेवण उशिरा का केलेस, या कारणावरून इद्रिस गौरीशंकर यादव (वय 23, मूळ गाव साहुपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा.कुपवाड एमआयडीसी) या तरुणाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केला. इस्लामपूर येथील यल्लमा चौकात किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून गौरव हेमंत कुलकर्णी (वय 24) या तरुण फोटोग्राफरचा खून केला. या तिन्ही घटना सलग घडल्याने जिल्हा हादरला, तर कार्वे (ता. खानापूर) येथे भांडणाचा राग मनात धरून चालत्या गाडीतून बाहेर ओढून पैलवान राहुल गणपती जाधव (वय 35) यांच्यावर तलवारीने डोक्यात सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकारही घडला होता. तत्पूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेठ (ता. वाळवा) येथे दोन भावांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सचिन सुभाष लोंढे (वय 37, रा. साठेनगर, पेठ ) या मित्राच्या छातीत चाकूने भोसकून खून करण्यात आला. एकूणच गेल्या महिन्यात जिल्ह्यात खुनांची मालिकाच सुरू आहे.

आजचे अल्पवयीन गुन्हेगार उद्याचे डॉन

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. घरफोडी, जबरी चोरी, खुनीहल्ला असो अथवा खून, यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक बनला आहे. शहरातील एका खुनाच्या घटनेत अल्पवयीन चार मुलांनी मै हूँ डॉन... गाण्यावर आधी रिल्स बनविली. नंतर कोयता व चाकूने सपासप वार करून एका तरुणाचा खून केला. हरिपूर रस्त्यावरील एका खुनातही अल्पवयीन मुले ताब्यात घेतली होती. आजचे हे अल्पवयीन गुन्हेगार उद्याचे डॉन बनून गुन्हेगारी विश्वात सक्रिय होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात 2023 साली 66 खून झाले होते. यंदा त्यात 15 ने घट झाली. 2024 मध्ये खुनाच्या 51 घटना घडल्या. यात अनैतिक संबंध, जमिनीचे वाद, आर्थिक वाद, चारित्र्याचा संशय, पूर्ववैमनस्य आदी कारणांमुळे खुनाच्या घटना घडल्या होत्या. अगदी किरकोळ कारणावरूनही खुनाचे प्रकार होत आहेत. कोयते, चाकू, तलवारी अशी हत्यारे सहज उपलब्ध होत आहेत. अगदी 50 रुपयांसाठी तरुणाचा मुडदा पाडण्यात आल्याने संपूर्ण समाजमनच सुन्न झाले आहे.

पोलिसिंगअभावी गुंड प्रवृत्ती वाढली

जनतेशी कमी झालेली जवळीक, लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे संख्याबळ, अपुर्‍या सुविधा, बेसिक पोलिसिंगच्या अभावामुळे जिल्ह्यात गुन्ह्यांचा आलेख वाढू लागला आहे. एका महिन्यात खुनाच्या चार घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खुनाच्या चारही घटनांतील संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असल्या तरी, सक्रिय गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article