Amravati | अनैतिक संबंधात ठरला अडसर, पतीचा डोक्यात लोखंडी गज मारून खून

2 hours ago 1

अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खून प्रकरणी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (Pudhari Photo)

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 4:06 am

Updated on

31 Jan 2025, 4:06 am

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनैतिक संबंधातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला २९ जानेवारी रोजी अटक केली. मनोज वामणराव नागापुरे (४०, रा. तळेगाव दशासर) असे मृत पतीचे नाव आहे. तर उमेश शिवा शिंदे (वय २७, रा. वार्ड क्र. २, तळेगाव दशासर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला तळेगाव दशासर पोलिसांच्या ताब्यात आले आहे. आरोपीचे मृताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते.

अधिक माहितीनुसार, तळेगाव हद्दीत निमगव्हाण फाट्याजवळ दुचाकी क्रमांक एच एच २७ सी. आर. ३७५० वर एक इसम रक्तबंबाळ अवस्थेत असल्याची माहिती २९ जानेवारी रोजी रात्री पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून तळेगाव पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता अज्ञात आरोपीने मनोज वामणराव नागापुरे याच्या डोक्यावर जड वस्तूने जबर प्रहार करुन ठार मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. सदर घटनेच्या अनुषंगाने मृतक याचा भाऊ सुनील वामनराव नागपुरे (रा. तळेगांव) याच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा आणि तळेगाव येथील पोलीस यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी संशयीत म्हणून उमेश शिवा शिंदे यास ताब्यात घेतली. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

मनोज नागापुरे याच्या पत्नीचे उमेश शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो त्यांच्या संबंधात अडसर ठरला होता. तसेच याच कारणावरून तो आपल्या पत्नीस मारहाण करीत होता. त्यामुळे आरोपी उमेश शिंदे याने मनोजला दारु पिण्याच्या बहाण्याने त्याच्या शेतात नेले आणि तो बेसावध असताना त्याच्या डोक्यावर लोखंडी गजाने जबर प्रहार करून त्याला ठार केले. त्यानंतर अपघाताचा बनाव रचून मनोज आणि त्याची स्कुटी रस्त्याच्या कडेला आणून टाकली, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनील पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम, सागर हटवार, मुलचंद भांबुरकर आणि अन्य पोलिस अंमलदार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article