‘जीबीएस’बाधित गावांमधील जलवाहिन्या, ड्रेनेजलाइनची दुरुस्ती

2 hours ago 1

‘जीबीएस’बाधित गावांमधील जलवाहिन्या, ड्रेनेजलाइनची दुरुस्तीPudhari

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 6:25 am

Updated on

31 Jan 2025, 6:25 am

पुणे/खडकवासला: जीबीएस आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी या भागांमध्ये झाला आहे. येथील अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या ड्रेनेजलाइनमधून गेल्याचे धक्कादायक वास्तव ’पुढारी’ने समोर आणले. यानंतर प्रशासनाला जाग आली असून, खराब जलवाहिन्या बदलणे आणि दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड, नांदोशी, किरकटवाडी व धायरी या जीएसबीबाधित गावांतील गळती होणार्‍या ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने युध्दपातळीवर सुरू केले आहे. दुसरीकडे या भागातील तब्बल आठ किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या इमारती, रस्त्याखाली अडकल्याने त्यांची गळती शोधण्याचे व दुरुस्तीचे काम करण्याचे मोठे आव्हान उभे असल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

जीएसबी रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आरोग्य, पाणीपुरवठा, मलनिस्सारण विभागासह आपत्कालीन व्यवस्थापनाची पथके 24 तास सज्ज ठेवली आहेत. दूषित पाणी आढळल्यास नागरिकांनी तातडीने पाणीपुरवठा तसेच सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त नामदेव भजबळकर यांनी केले आहे.

नांदेड येथील विहिरीतून या चार गावांना पाणीपुरवठा होत असल्याने विहिरीच्या जवळील तसेच मुख्य व अंतर्गत जलवाहिन्यांच्या शेजारून गेलेल्या ड्रेनेजलाइनला दहा ठिकाणी गळती असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. त्यामुळे मलनिस्सारण विभागाने या ठिकाणी तातडीने ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

सिंहगड रोड मलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता निष्णांत छापेकर म्हणाले, नांदेड येथे दहा ठिकाणी ड्रेनेजलाइनमधून मैलापाण्याची गळती सुरू होती. त्याठिकाणी दुरुस्ती करून नवीन वाहिन्या बसविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अक्षय गावित म्हणाले की, दूषित पाण्यामुळे जीएसबी साथ सुरू झाल्याने खबरदारी म्हणून जलवाहिन्यांची गळती शोधण्यात येत आहे. त्यासाठी आठ पथके स्थापन केली आहेत.

आठ किलोमीटरच्या जलवाहिन्या रस्ते, इमारतीखाली

नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी परिसरात जीबीएस रोगाच्या साथीने थैमान घातले आहे. या गावातील निम्म्याहून अधिक अंतराच्या मुख्य जलवाहिन्या मोठमोठ्या इमारती, बांधकाम, लोकवस्त्यांसह रस्त्याखाली अडकलेल्या असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

यात नांदोशी गावच्या सर्वात अधिक जवळपास तीन किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या मोठमोठ्या इमारतीखाली अडकल्या आहेत. ग्रामपंचायत काळात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. नांदेड फाटा, किरकटवाडी ते नांदोशीपर्यंत थेट या जलवाहिन्यांवरच इमारती, घरे, गोदामे, सोसायट्या उभारण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article