बालवैज्ञानिक मेळ्यात कलागुणांचा अविष्कार:शेतशिवार ते ब्रम्हांडापर्यंतच्या विषयांचा समावेश; हजाराे विद्यार्थ्यांची भेट‎

2 hours ago 2
विज्ञान तंत्रज्ञानातील एकाहून एक सरस, त्यातही शेत शिवारापासून ते ब्रम्हांडापर्यंतच्या प्रात्यक्षिकांनी येथील बालवैज्ञानिकांचा मेळा बहरला आहे. राज्यभरातून ३३० शाळांनी यात सहभाग नोंदवला असून, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना स्वतंत्ररित्या प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांच्यासाठीचा वेगळा गटही तयार करण्यात आला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेने या मेळ्याचे आयोजन केले आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या मेळ्यात उत्कृष्ट शेतीसह चंद्रावर स्वारी करण्यापर्यंतचे सर्व विषय समाविष्ट केले आहेत. अभ्यास कसा लक्षात ठेवावा, यासाठीच्या अत्यंत सहज-सुलभ टिप्सही या ठिकाणाहून प्राप्त केल्या जाऊ शकतात. भाषेचे व्याकरण, आकडेमोड, वेगवेगळी सूत्रे अत्यंत प्रभावीरीत्या मांडण्याचे कसबही अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांच्या माध्यमातून सादर केले आहे. याशिवाय फायर फायटिंग, स्मार्ट फार्मिंग, दाराची स्वयंचलित उघडझाप, ॲग्रीशिल्ड, सोलर ट्रॅकिंग मशीन, मशरूम उत्पादन, बेस्ट फ्रॉम वेस्ट, प्लास्टिकचा पुनर्वापर आदी अनेक प्रयोगही याठिकाणी सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रयोग पाहण्यासाठी दररोज या विज्ञान मेळ्याला हजार विद्यार्थी भेट देत आहेत. शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके आणि प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी त्यासाठीचे सूक्ष्म नियोजन केले. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उद्या देणार प्रदर्शनास भेट या प्रदर्शनाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर भेट देणार आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार दुपारी १२ वाजता ते या प्रदर्शनास भेट देतील. दरम्यान याच दिवशी सायंकाळपर्यंत परीक्षणाचे कार्य पूर्ण होऊन राष्ट्रीय विज्ञान मेळ्यासाठी निवडावयाच्या दहा मॉडेल्सची घोषणा केली जाणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article