अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून:भासवला अपघात, मृतदेह महामार्गावर टाकला; तळेगाव दशासर येथील धक्कादायक घटना
2 hours ago
2
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील एका ४० वर्षीय तरुणाचा डोक्यात वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरील निंभी फाट्याजवळ टाकून अपघाताचा बनाव केला होता. मात्र पोलिसांना आरोपीचा हा बनाव लक्षात येताच अवघ्या दोन तासात पोलिसांनी मारेकऱ्यास अटक केली. हा धक्कादायक घटनाक्रम तळेगाव दशासर येथे बुधवारी (दि. ३०) मध्यरात्री समोर आला. मारेकरी तरुण आणि मृताच्या नातेवाईक महिलेचे अनैतिक संबंध होते. त्या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे ४० वर्षीय तरुणाचा खून केल्याचे समोर आले आहे. मनोज वामनराव नागापुरे (४०) असे मृताचे, तर उमेश शिवा शिंदे (२७, दोघेही रा. तळेगाव दशासर) असे मारेकऱ्याचे नाव आहे. उमेशचे मागील काही दिवसांपासून मनोजच्या महिला नातेवाइकासोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून मनोज आणि संबंधित महिलेचे वाद व्हायचे. या वादातून मनोज तिला मारहाण करत होता. दरम्यान बुधवारी रात्री साडेनऊ सुमारास उमेश हा मनोजला भेटला व दारू पिण्यासाठी घेण्यासाठी घेऊन गेला. ते एका शेतात दारू पिले. त्यानंतर उमेशने लोखंडी वस्तूने मनोजच्या डोक्यात प्रहार केला. यात मनोजचा शेतातच मृत्यू झाला. दरम्यान खुनाचा पुरावा नष्ट करून मनोजचा मृत्यू अपघाती आहे, हे भासवण्यासाठी उमेशने शक्कल लढवली. त्याने मनोजचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवरून पाच किमी. अंतरावरून जाणाऱ्या संभाजीनगर ते नागपूर हायवेवरील निंभी फाट्याजवळ आणला. रात्रीच्या वेळी हायवेवर कोणीही नसल्याचे पाहून मनोजचा मृतदेह महामार्गावर फेकला. दरम्यान काही वेळानंतर मनोजचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यावर मनोजचे नातेवाइक व तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंगडे पथकासह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा अपघात नसल्याचे स्पष्ट झाले. मनोजच्या केवळ डोक्यावर मार होता. तसेच दुचाकी सुस्थितीत होती आणि अपघात झाल्याबाबत रस्त्यावर कोणतीही निशाणी पोलिसांना दिसली नाही. त्यामुळे पोलिसांनी हा खून असल्याच्या निष्कर्षावर पोहोचून मारेकऱ्याचा शोध सुरू केला. दरम्यान उमेश आणि मनोज हे दोघे रात्री सोबत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी उमेशला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. ^अनैतिक संबंधात अडसर ठरल्यामुळेच मनोजचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उमेश शिंदेला अटक केली आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. -एपीआय रामेश्वर धोंडगे, ठाणेदार, तळेगाव दशासर. स्कूटीवर पाच किमी मृतदेहाचा प्रवास मनोजच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केल्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन शेतातच मृत झाला. त्यानंतर उमेशने स्कूटीवर समोरच्या बाजूला असलेल्या जागेत मनोजला बसवले आणि जवळपास पाच किलोमीटर नेले. त्यानंतर महामार्गावर नेऊन मनोजचा मृतदेह टाकून दिला आणि उमेश त्या ठिकाणाहून निघून गेला. पाच किलोमीटर मृतदेह नेल्यामुळे उमेशचे कपडे रक्ताने माखले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)