जलजीवन मिशन अंतर्गत कालावधी पूर्ण होऊनही नळ योजनेचे काम अपूर्णच:वनोजा येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा करावा लागणार सामना‎

2 hours ago 2
मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील जल जीवन अंतर्गत होणाऱ्या नळ योजनेचे काम अनेक महिन्यापासून रखडलेले असून, कामाचा कालावधी पूर्ण होऊनही काम अपूर्ण आहे. यामुळे या उन्हाळ्यातही येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनोजा येथे जल जीवन मिशन, हर घर जल योजने अंतर्गत २०२२ मध्ये ४,९५,२४,३० रुपयांची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. यामध्ये काही निधी केंद्र सरकार तर काही निधी राज्य सरकार ने दिला आहे. ही योजना जुलै २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी होता. मात्र २०२५ लागले तरीही या योजनेचे काम अजूनही पुर्ण झाले नाही. यामुळे रखडलेले काम कधी पूर्णत्वास जाणार असा प्रश्न आता येथील ग्रामस्थांना पडत आहे. हे काम लवकर पूर्ण न झाल्यास या वर्षीही येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. ग्राम प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाला माहिती देऊन ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच गावात ठिकठिकाणी कंत्राटदाराने रस्ते खोदून पाइपलाइन केली आहे. ते रस्ते संबंधित कंत्राटदारा कडून अजूनही व्यवस्थित करण्यात आले नाही. संबंधित विभागाने दखल घेऊन कंत्राटदारा कडून, लवकर काम पूर्ण न करून घेतल्यास आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याआधीही या योजनेची काम निकृष्ट दर्जाचे आणि दिरंगाईने होत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून या उन्हाळ्यातरी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाई सामना करावा लागणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काम अपूर्ण असलेले जलकुंभ. निर्माण होणाऱ्या समस्येला संबंधित विभाग जबाबदार गावात जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या नळ योजनेचे काम कालावधी पूर्ण होऊनही अजून पूर्ण झालेले नाही. याबाबत आम्ही संबंधित विभागाला लवकर काम पूर्ण करण्यासाठी पत्र दिले आहे. काम लवकर पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे याची दखल घेऊन काम लवकर पूर्ण करावे. अन्यथा यापुढे निर्माण होणाऱ्या समस्येला संबंधित विभाग जबाबदार असेल. -डॉ. श्रीराम मुखमाले, सरपंच वनोजा ग्रामस्थांना लवकरच पाणी पुरवठा सुरुळीत होईल शासना कडून नेमून दिलेल्या कंपनीकडून वेळेवर पाइप मिळाले नाही. तर काही ठिकाणी वन विभागातून पाइपलाइन जात असल्यामुळे त्यांची परवानगी हवी आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास वेळ लागला आहे. तसेच वीज पुरवठा कमी दाबाचा असल्याने अडचण होती. लवकरच काम सुरू करून यावर्षी ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरुळीत होईल . -रामदास मुंढे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अधिकारी वाशीम

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article