अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाकडे विकासकांनी फिरवली पाठ, म्हाडाकडून निविदेला पुन्हा मुदतवाढ

3 hours ago 1

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ऑक्टोबरला निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या निविदेला विकासकांचा प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा एकदा दोन आठवडय़ांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक कंपन्यांना आता 13 फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करता येणार आहे.

अभ्युदय नगर, काळाचौकी वसाहतीत 1,33,593 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सद्यस्थितीत 48 इमारती असून 208 चौरस फूट आकारमानाच्या 3410 सदनिका आहेत. पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ किमान 635 चौरस फूट असावे, प्रत्येक सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावी, प्रत्येक सदनिकाधारकाला पाच लाख रुपये काॅर्पस फंड एकदाच द्यावा, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दरमहा सदनिकाधारकाला वीस हजार रुपये भाडे द्यावे अशा अटी या निविदेत समाविष्ट आहेत. समूह पुनर्विकासासाठी म्हाडातर्फे ऑक्टोबरला निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, तांत्रिक बोली निविदा 22 नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार होती. मात्र, विकासकांनी पाठ फिरवल्यामुळे वारंवार मुदतवाढ देण्याची वेळ म्हाडावर ओढावली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article