आरे स्टॉलधारकाच्या मृत्यूनंतर अथवा पेंद्रधारक वयोमानानुसार 60 वर्षे झाल्यास किंवा जर्जर आजाराने त्रस्त झाल्यास वारसाच्या नावावर पेंद्र हस्तांतर करावे. त्यासाठी वारसाला कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरण सेनेने दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्यांकडे केली आहे.
मुंबईतील आरे स्टॉलधारकाच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. या वेळी आरे स्टॉल महानंदा दुग्धशाळेला हस्तांतर करण्यापूर्वी स्टॉलधारकांना विश्वासात घ्यावे, स्टॉलधारकांना मदतनीस ठेवण्याकरिता परवानगी द्यावी, स्टॉलचे भाडे थेट महापालिकेला भरणा करण्यास परवानगी द्यावी, आरेची सहउत्पादने विकण्यास रॉयल्टी तत्त्वावर परवानगी द्यावी, या मागण्या करण्यात आल्या. यावर पुढील 15 दिवसांत पुन्हा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले.