ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गांधी-जवाहर बागेची दुरवस्था:मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाला अवकळा झाली प्राप्त

3 hours ago 2
अस्ताव्यस्त वाढलेली झाडे, साफसफाई होत नसल्याने पडून राहणारा पालापाचोळा, अखेरचा श्वास घेत असलेल्या विविध वास्तू व स्मारके, नियमित पाणी न दिल्याने सुकलेली झाडे, हिरवळ आणि यामुळे प्राप्त झालेले बकाल स्वरूप... शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गांधी-जवाहर बागेतील हे सध्याचे चित्र आहे. अकोला शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या गांधी-जवाहर उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून विकसित केलेल्या व शहरातील अनेक आंदोलनाचे साक्षी ठरलेल्या गांधी-जवाहर बागेची अवस्था दयनीय आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार व सुरक्षा भिंत नाममात्र आहे. यामुळे उनाड मुलांच्या टोळीचा येथे सतत वावर असतो. गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्यानाचा आढावा घेतला असता येथील दुरावस्था व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पुढे आले. बागेत लहान मुलांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजुने बालउद्यान होते. यामध्ये घसरगुंडी, तसेच अनेक लहान खेळणी होती. या सर्व खेळण्यांची मोडतोड झाली आहे. सध्या खेळण्यांचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत. तसेच बागेच्या मागील बाजूला खुले नाट्यगृह आहे. हा परिसर सध्या "खुले स्वच्छतागृह'' बनले आहे. येथील कचरा आणि दुर्गंधी असह्य आहे. बालउद्यान, नाट्यगृह भकास विसावा केंद्र हरवले बसस्थानक, मुख्य बाजार परिसरात हे उद्यान आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी एकप्रकारे हे विश्रांती केंद्रच होते. विशेषत: अकोल्यातील उन्हात त्याचा उपयोग अधिक होत असे. पण सध्याची अवस्था बघता नागरिक फारसे इकडे भरकटत नाहीत. उनाड पोरांचे सिगारेट झोन उद्यानात फेरफटका मारला असता पंडित जवाहर नेहरू यांच्या पुतळ्याला रेटूनच काही तरुण मंडळी चक्क सिगारेट ओढतानाचे दुर्दैवी दृश्य नजरेत पडले. हे येथील नियमित दृश्य असल्याचे काहींनी सांगितले. उद्यानातील सिमेंटच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. यामुळे नागरिकांना खाली जमिनीवर कचऱ्यात बसावे लागते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article