कोरची (Gadchiroli) :- शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील बहुउद्देशिय सभागृहात विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या अंतर्गत ‘कायदेविषयक शिक्षण शिबिराचे’ (Education camp) आयोजन करण्यात आले. शासन बालकांच्या व महिलांच्या विकासासाठी कठिबद्ध आहे. महिलांना व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
महिलांना व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य
समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना कायदेविषयक महिती या शिबिरामार्फत निशुल्क देण्यात आली यावेळी बालकांचे अत्याचार पासून संरक्षणासाठी पोक्सो(POCSO) कायद्यासंबंधी तरतुदी व चांगला स्पर्श व वाईट स्पर्श(गुड टच व बॅड टच) या विषयी महिती, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण विषयक पॉश(POSH) कायद्याविषयी माहिती,कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदयामधील कलमाची माहिती तसेच बालगुन्हेगारी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समान हक्क कायदा यासंबंधी कायदेशीर कारवाई तसेच मनोधैर्य योजनेची सविस्तर माहिती सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट स्नेहाताई मेश्राम यांनी दिली.
बालगुन्हेगारी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समान हक्क कायदा
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवराना कायद्यासंबधी काही प्रश्न विचारून शंका समाधान करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आर.आर.पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रशांतजी गड्म साहेब तहसीलदार कोरची, मंडल अधिकारी श्रीमती पोरेटीताई कोरची, मुख्याध्यापक उमाकांत ढोक, प्राचार्य धर्मेंद्र ठाकूर, एकलव्य व आश्रम शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी तथा कोरची परिसरातील महिला बहुसंख्येने या शिबिरात सहभागी होऊन कायदेविषयी माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.रमेश रामटेके तर आभारप्रदर्शन प्रा. हरेश कामडी यांनी केले.