उमरा येथील स्मशानभूमीचा लोकवर्गणीतून कायापालट:पवन कुमार मिश्रा मित्र परिवाराने घेतला पुढाकार

3 hours ago 2
उमरा येथील स्मशानभूमी क्रमांक २ मध्ये अगोदर पाय ठेवण्याकरितासुद्धा जागा शिल्लक नव्हती. अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. परंतु कालांतराने पवन मिश्रा मित्र परिवार मंडळी एकत्र येऊन गावच्या विकासाकरिता चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला व त्यांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे ठरवले. कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याला शेवटचा दिवस स्मशानभूमीतच असतो. त्यामुळे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष पवन मिश्रा, समाजसेवक महेंद्र खवले यांनी पुढाकार घेत स्मशानभूमी सर्वप्रथम स्वच्छता अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्याकरता बाकडे असायला हवे म्हणून लोकवर्गणी जमा करायला सुरुवात केली. ज्यांच्या घरातील सदस्य मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ एक बेंच देण्यात यावा,असे आवाहन करण्यात आले. त्याला सर्वांनी सकारात्मक निर्णय असल्याची सहमती दर्शवली. त्याचबरोबर स्मशानभूमीमध्ये भगवान शंकराची दिव्य मूर्तीची स्थापना लक्ष्मणराव खवले यांच्या हस्ते करण्यात आली बघता ५१ बाकडे बसवण्यात आलेले आहेत. व चार लक्ष रुपयांची देणगी प्राप्त झाली असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. त्या सोबतच झाडांच्या व निरनिराळ्या फुलांच्या बागा फुलवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे स्मशानभूमीचे चित्र पलटले दिसून येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article