Manora: जनसंघर्ष अर्बन निधी घोटाळा प्रकरणातील सर्व संचालक आरोपींच्या लाखों किंमतीचे चारचाकी वाहने केली जप्त

2 hours ago 2

मानोरा (Manora) :- यवतमाळ जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या दिग़स येथील जनसंघर्ष अर्बन निधीच्या संचालक आरोपीतांनी खातेदार व ठेवीदार यांच्या घामाचे आणि कष्टाच्या रक्कमेवर कोटी रुपयांचा डल्ला मारून घोटाळा केला. याच पैश्यातून आलीशान फिरण्यासाठी व पायवाट काढण्याकरिता लाखों किंमत असलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या चारचाकी वाहने खरेदी करुन त्या गाडीत मज्जा मारत फिरत होते. त्याच नामांकित कंपन्यांच्या चारचाकी वाहने पोलीसांनी जप्त करुन दिग्रस येथील ठाण्यात आणून जमा केली आहे.

नामांकित कंपन्यांच्या चारचाकी वाहने पोलिसांकडून जप्त

दि. १ फेब्रुवारीपासून तारण कर्ज, व्यावसायिक कर्ज तसेच संचालक आरोपी यांनी अपहाराच्या रक्कमेतून केलेल्या व्यवहारातून शिल्लक रक्कम परत करण्याबाबत सर्व संबंधित व्यक्तींना १५ दिवसांची मुदत दिली असल्याने त्यांचे पैसे देखील न्यायालय (Court) अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा तथा प्रमुख आर्थिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचेकडे भरणा करता येणार आहे. अपहार प्रकरणातील मास्टरमाईंड प्रणित मोरेचा तोतया वसुली अधिकारी आलमगीर खान जागीर खान याची पोलीस कोठडी ३ तारखेला पर्यंत असल्यामुळे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने हे आरोपींचा कसून तपास पोलीस ताफ्यासह तपास करत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article