गडकिल्ले भ्रमंतीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष रेल्वे:राजगड, अलिबाग, जंजिरा, सिंधुदुर्ग किल्लेसफारीसाठी अनारक्षित गाडी
3 hours ago
2
विदर्भातील नागरिकांना कोकणातील गडकिल्ले बघता यावेत यासाठी मध्य रेल्वेने धारातीर्थ गडकोट मोहीम २०२५ च्या निमित्ताने अनारक्षित विशेष रेल्वेची सोय केली आहे. ही विशेष रेल्वे गाडी ६ फेब्रुवारीला नवी अमरावती अकोली रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.३० वाजता रवाना होईल. ही गाडी अकोला रेल्वे स्थानकावर ४.३० वाजता पोहचणार आहे. त्याचप्रमाणे ११ फेब्रुवारीला ही गाडी वीर स्थानकावरून परतीसाठी रात्री १० वाजता प्रस्थान करेल. त्यामुळे मधल्या चार दिवसांत पर्यटकांना रायगड, अलिबाग, मुरूड जंजिरा, सिंधुदुर्ग असे किल्ले बघता येतील. या विशेष रेल्वेचे प्रतिव्यक्ती अनारक्षित तिकीट २५० रुपये आहे. ही विशेष ट्रेन जाणे-येणे अशा दोनच फेऱ्या करणार आहे. ०९१०१ क्रमांकाची विशेष गाडी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नवी अमरावती अकोली रेल्वे स्थानकाहून प्रस्थान करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता ही गाडी वीर स्थानकावर पोहोचेल. यादरम्यान रेल्वे बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल व रोहा या स्थानकावर थांबा घेईल. तसेच गाडी क्र. ०९१०२ ही ११ फेब्रुवारीला रात्री १० वाजता वीर स्थानकावरून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता नवी अमरावती अकोली स्थानकावर पोहोचेल. मार्गात ती रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा हे थांबे घेईल. धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या निमित्ताने कोकणात थेट जाऊन किल्ले बघण्याची पर्यटकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पर्यटकांना विविध ठिकाणी कमी खर्चात जाणे शक्य होत आहे. विविध ठिकाणी जाण्यासाठी मध्ये रेल्वेचा स्वस्त पर्याय १६ सामान्य द्वितीय श्रेणी व २ सेकंड सिटींग चेअर कारसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी या विशेष रेल्वेची संरचना आहे. या गाडीचा लाभ विदर्भातील शिवप्रेमी, पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेद्वारे करण्यात आले. या गाडीमुळे प्रवाशांना राज्यात विविध ठिकाणी जाण्यासाठी अतिरिक्त व स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. सोबतच छत्रपती शिवरायांनी राज्यात उभारलेले गडकिल्लेही बघता येणार आहेत. बहुतांश गडकिल्ले हे कोकणात आहेत. त्यामुळे ही गाडी वीर स्थानकापर्यंत चालवली जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)