थकीत पगाराच्या प्रश्नावर गिरणी कामगारांची निदर्शने, राष्ट्रीय मिल मजदूर संघाची एनटीसी कार्यालयावर धडक

3 hours ago 2

मुंबईतील एनटीसीच्या चार बंद गिरण्यांतील कामगारांच्या थकीत पगाराच्या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाने गुरुवारी बॅलर्ड पिअर येथील एनटीसीच्या प्रधान कार्यालयावर धडक दिली. यावेळी बंद मिलच्या कामगारांनी तीव्र निदर्शने केली.

संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर, सेव्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एनटीसीचे कार्यकारी अधिकारी पी. पुंगुमाराजू यांची भेट घेतली. त्यावर गिरणी कामगारांचा थकीत पगार दोन महिन्यांत दिला जाईल आणि पुढे तो सातत्याने मिळत राहील. त्याचबरोबर गिरण्या बंदच्या काळात निवृत्त होणाऱया कामगारांना त्यांची देणी देण्याबाबत तसेच खातेनिहाय सेवा बढतीचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासन एनटीसीच्या अधिकाऱयांनी दिले. दीपक राणे, बबन आसवले, प्रकाश भोसले, सखाराम भणगे, गजानन कदम, सुनीता खराडे, पूजा माळकर, छाया पाटील, सुभाष नारकर, राजेंद्र नारकर, आरती आणसूळकर आदी आंदोलनात सहभागी होते.

बंद गिरण्या चालवा, अन्यथा पगार द्या!
एनटीसीच्या बंद गिरण्यांच्या प्रश्नाबाबत पेंद्रीय वस्त्राsद्योगमंत्र्यांना निवेदन दिले असून लवकरच वस्त्राsद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. बंद गिरण्या चालवाव्याच लागतील, अन्यथा कामगारांना पगार द्या, असा इशारा सरकारला आंदोलनाद्वारे देण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article