सोलापूर : सोलापूर विभागाच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरुवारी (दि.३०) सोलापूर विभागीय रेल्वे कार्यालयात झाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा या बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत सदस्यांनी प्रामुख्याने सुविधा व समस्या व सूचना देऊन रेल्वे प्रश्न प्रशासनाची चर्चा केली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. मिश्रा यांनी प्रश्नावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे. एन. गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) सचिन गणेर आदी उपस्थित होते. तसेच सोलापूर विभागातील रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य संजय पाटील, हेमंत धवलशंक, आकाश गोरे, प्रदीप पवार, भारत जाधव, रामगोपाल लोया, हर्षद मोरे, विनोद भरते, बापूगौडा पाटील, डॉ. अस्मिता बालगांवकर यांनी बैठकीत मुद्दे मांडले.
बैठकीला संबंधित करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. मिश्रा यांनी सोलापूर विभागातील प्रवासी सुविधांसाठी सुरू असलेली विविध कामे, पायाभूत सुविधांची कामे, विकास कामे याबाबत सविस्तर माहिती दिली. रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावणे, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.