प्रतीक गोस्वामी मध्य रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकपदी, पदभार स्वीकारला

3 hours ago 1

मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून प्रतीक गोस्वामी यांनी पदभार स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस 1990च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक व मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच कोकण रेल्वे महामंडळाच्या मुख्य दक्षता अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे.

गोस्वामी यांनी 34 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय रेल्वे तसेच इतर संघटनांमध्ये विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते जयपूरच्या मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून मुंबईच्या आयआयटीमधून पदव्युत्तर पदवीधर झाले आहेत. मध्य रेल्वेची प्रगती आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article