तालुक्यातील तळेगाव दशासरयेथील एका ४० वर्षीय तरुणाचाडोक्यात वार करून खून केला.त्यानंतर मृतदेह संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरील निंभी फाट्याजवळटाकून अपघाताचा बनाव केला होता. मात्र पोलिसांना आरोपीचा हा बनाव लक्षात येताच अवघ्या दोन तासात पोलिसांनी मारेकऱ्यास अटक केली.हा धक्कादायक घटनाक्रम तळेगाव दशासर येथे बुधवारी (दि. ३०) मध्यरात्री समोर आला. मारेकरीतरुण आणि मृताच्या नातेवाईकमहिलेचे अनैतिक संबंध हाेते. त्या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे४० वर्षीय तरुणाचा खून केल्याचेसमोर आले आहे. मनोज वामनराव नागापुरे (४०)असे मृताचे, तर उमेश शिवा शिंदे(२७, दोघेही रा. तळेगाव दशासर)असे मारेकऱ्याचे नाव आहे. उमेशचेमागील काही दिवसांपासून मनोजच्यामहिला नातेवाइकासोबत अनैतिकसंबंध हाेते. या कारणावरून मनोजआणि संबंधित महिलेचे वाद व्हायचे.या वादातून मनोज तिला मारहाणकरत होता. दरम्यान बुधवारी रात्रीसाडेनऊ सुमारास उमेश हा मनोजलाभेटला व दारू पिण्यासाठीघेण्यासाठी घेऊन गेला. ते एकाशेतात दारू पिले. त्यानंतर उमेशनेलोखंडी वस्तूने मनोजच्या डोक्यातप्रहार केला. यात मनोजचा शेतातचमृत्यू झाला. दरम्यान खुनाचा पुरावा नष्ट करूनमनोजचा मृत्यू अपघाती आहे, हेभासवण्यासाठी उमेशने शक्कललढवली. त्याने मनोजचा मृतदेहत्याच्याच दुचाकीवरून पाच किमी.अंतरावरून जाणाऱ्या संभाजीनगर तेनागपूर हायवेवरील निंभीफाट्याजवळ आणला. रात्रीच्यावेळी हायवेवर कोणीही नसल्याचेपाहून मनोजचा मृतदेह महामार्गावरफेकला. दरम्यान काही वेळानंतर मनोजचाअपघात झाल्याची माहितीमिळाल्यावर मनोजचे नातेवाइक वतळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वरधोंगडे पथकासह घटनास्थळीपोहोचले व त्यांनी मृतदेहाची पाहणीकेली असता हा अपघात नसल्याचेस्पष्ट झाले. मनोजच्या केवळडोक्यावर मार होता. तसेच दुचाकीसुस्थितीत होती आणि अपघातझाल्याबाबत रस्त्यावर कोणतीहीनिशाणी पोलिसांना दिसली नाही.त्यामुळे पोलिसांनी हा खूनअसल्याच्या निष्कर्षावर पोहाेचूनमारेकऱ्याचा शोध सुरू केला.दरम्यान उमेश आणि मनोज हे दोघेरात्री सोबत असल्याची माहितीमिळताच पोलिसांनी उमेशलात्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याचीसखोल चौकशी केली असता त्यानेखून केल्याची कबुली दिली. महामार्गावर मनोजचा मृतदेह ज्या ठिकाणी टाकला होता, त्या ठिकाणाचीपाहणी करताना पोलिस अधिकारी तसेच घटनास्थळी पोहाेचलेले पोलिस. स्कूटीवर पाच किमी मृतदेहाचा प्रवास मनोजच्या डोक्यावर लोखंडीवस्तूने प्रहार केल्यामुळे तोरक्तबंबाळ होऊन शेतातच मृतझाला. त्यानंतर उमेशने स्कूटीवरसमोरच्या बाजूला असलेल्याजागेत मनोजला बसवले आणिजवळपास पाच किलोमीटर नेले.त्यानंतर महामार्गावर नेऊनमनोजचा मृतदेह टाकून दिलाआणि उमेश त्या ठिकाणाहून निघूनगेला. पाच किलोमीटर मृतदेहनेल्यामुळे उमेशचे कपडे रक्तानेमाखले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू अनैतिक संबंधात अडसरठरल्यामुळेच मनाेजचा खूनकेल्याचे तपासात निष्पन्न झालेआहे. त्यामुळे उमेश शिंदेला अटककेली आहे. प्रकरणाचा सखोलतपास सुरू आहे. या प्रकरणात अन्यकोणाचा सहभाग आहे का, याबाबततपास सुरू आहे. -एपीआय रामेश्वर धोंडगे,ठाणेदार, तळेगाव दशासर.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)