बोकुड जळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात चोरी file photo
Published on
:
30 Jan 2025, 7:02 am
Updated on
:
30 Jan 2025, 7:02 am
पैठण : पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रातील किंमती साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या संदर्भात बिडकीन पोलीस ठाण्यात आरोग्य अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी की तालुक्यातील बोकुड जळगाव येथील उपआरोग्य केंद्रात अज्ञात चोरट्याने बुधवारी रात्री संगणक सामग्री व इतर वस्तू चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी रोजी येथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती वरिष्ठ डॉक्टर अधिकाऱ्यांना देण्यात आली. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दवाखान्यातील संगणक व रुग्णालयासाठी लागणारी जवळपास ७० ते ८० हजार रुपये किमती वस्तू लंपास केल्या आहेत. याप्रकरणी बोकुड जळगाव आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश शेळके यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे.