कार्तिकी यात्रेप्रमाणे माघी वारीवेळी‎वेळ वाढवून दर्शनाचे नियोजन करणार‎:रविवारी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा, समितीकडून तयारी सुरू‎

1 day ago 1
पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी माघी वारीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत नियोजन केले आहे. दि. २ ते १२ फेब्रुवारीदरम्यान माघ वारी संपन्न होत आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी मुख्य यात्रा आहे. या यात्रेला येणाऱ्या भाविकांना कार्तिकी यात्रेप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच माघ शुध्द पंचमी म्हणजे दि. २ फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत वेळ वाढवण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. माघ वारी पूर्व नियोजनाबाबत मंगळवारी भक्त निवास, पंढरपूर येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे, शिवाजीराव मोरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्रीउपस्थित होते. पंढरपूर | माघ शुध्द एकादशी शनिवारी (दि. ८) रोजी असून, यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच ्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी सोपवलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या. सोमवार, दि. ३ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत यात्रा आहे. माघ वारी पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपुरात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्थानिकांसाठी यापुढे संध्याकाळीही रात्री अर्धा तास दर्शनाची व्यवस्था स्थानिक भाविकांसाठी सध्या सायंकाळी ६ ते ७ या वेळेत दर्शन सुविधा उपलब्ध आहे. यापुढे रात्री १० ते १०.३० या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथून दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मंदिरातील सर्व लाकडी दरवाजांना मंदिर निधीतून किंवा देणगीदार भाविकांमार्फत चांदी लावणे, पालखी महामार्गावर कमान बसवणे, दर्शनरांगेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत, वयोवृध्द, विकलांग, गरोदर महिला इत्यादी भाविकांना सभामंडपातून प्राधान्याने दर्शन व्यवस्थेचा निर्णय घेतला. दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाश्ता, भोजन मंदिर समितीच्या वतीने पत्रा शेड, दर्शनरांग, दर्शन मंडप या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाश्ता व भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article