गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूचे अलाइनमेंट करायची वेळ आली:जरांगे पाटलांवर खालच्या भाषेत टीका करणे अयोग्य- सचिन खरात

12 hours ago 1
गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूचे अलाइनमेंट करायची वेळ आली आहे. सदावर्ते जरांगे पाटील यांच्यावर कायम खालच्या भाषेत टीका करतात ते योग्य नाही, असे रिपाई खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सचिन खरात म्हणाले की, परभणीमध्ये पोलिस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूवर यांच्या तोंडातून एक चकार शब्दही निघाला नाही. त्यांच्या कुटुंबीयांची भेटही यांनी घेतली नाही. नेमके खरात काय म्हणाले? सचिन खरात म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत असतात, हे अत्यंत चुकीचे आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत. ते शिवरायांचा विचार पुढे घेऊन जात आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर एक चकार शब्दही काढला नाही. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. हे स्वत:ला नथुराम गोडसे यांच्या विचाराचे कट्टर समर्थक असल्याचे जाहीरपणे सांगत असतात, यामुळे त्यांच्या मेंदूचे अलाइनमेंट करायला हवे, तशी वेळ आली आहे, असा टोला सचिन खरात यांनी लगावला आहे. ​​​​​​​ गुणरत्न सदावर्तेचे वक्तव्य काय? गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील म्हणजे एक स्टंटबाज आहे.या आंदोलनाला राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाचा नेता कोण? हे दर्शवणारं हे आंदोलन आहे. सुरेश धस असो की मनोज जरांगे पाटील हे दोन्ही पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. मराठा भावांना हे माहिती झालेलं आहे की, आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 टक्क्यांच्या वर देता येत नाही. ‘हैदर, अकबर, निजाम अरे भाई जरांगे आणखी काही लोकांना बोल, विचार करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article