आश्वी बु. अप्पर तहसील कार्यालयास विरोध; अनेकगावांतून मोठा संताप

11 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Jan 2025, 6:39 am

Updated on

30 Jan 2025, 6:39 am

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘एक तालुका, एक परिवार’ ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्याचा कुटिल डाव करणार्‍या सत्ताधार्‍यांनी आखला आहे. तालुका विभाजन करून संगमनेरमधील जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री व प्रशासनाने आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. निर्णयाविरुद्ध संगमनेर तालुक्यातील तरुणांसह प्रत्येक गावात मोठा संताप निर्माण झाला असून अनेक गावांमधून निषेध सभा घेत आश्वी बुद्रुक येथे होणार्‍या अप्पर तहसील कार्यालयास कडाडून विरोध करण्यात आला आहे.

संगमनेर तालुका विभाजनाबरोबर आश्वी बुद्रुक येथे जोर्वे, पिंपळनेर, संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा आश्वी बुद्रुक येथे होणार्‍या अप्पर तहसील कार्यालयात समावेश केला आहे. हा अध्यादेश कळताच संपूर्ण तालुक्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. याबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संगमनेर तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही, असा इशारा सरकारला दिला आहे. यानंतर गावागावांमधून या निर्णयाविरुद्धच्या निषेध सभा झाल्या.

चंदनापुरी, जोर्वे, सुकेवाडी, सावरगाव तळ, नीमज, खाजापूर ,वडगाव पान यांसह विविध गावांमध्ये निषेध सभा झाल्या याचबरोबर तातडीने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी ग्रामसभा व सर्व ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व ग्रामसभांना तरुणांसह महिला नागरिक यांची मोठी उपस्थिती होती तर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये या निर्णयाविरुद्ध मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून तरुणांनी सोशल माध्यमांवर याविषयी संताप व्यक्त केला आहे. हा अन्यायकारक निर्णय लाभल्यास संगमनेर तालुका पेटून उठेल आणि मोठे जन आंदोलन उभारण्यातील असा एकमुखी ठराव गावांमधून घेण्यात आला.

राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा डाव ठेवणार्‍या प्रशासनाविरुद्ध मराठा महासंघ, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, लोकसेवा संघ, संगमनेर तालुका विकास आघाडी यांच्यासह विविध पुरोगामी संघटना यांनी कडाडून विरोध केला असून हा निर्णय रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

प्रशासनाच्या सोयीच्या नावाखाली तालुका तोडण्याचा डाव आहे. पालकमंत्र्यांनी नियोजित तालुका डोक्यात ठेवून आगामी काळात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला या नवीन होणार्‍या तालुक्यात आमदार पद मिळावे याकरीता ही कुटनिती वापरली आहे आणि ही सर्वश्रुत आहे.

सुरेश थोरात, काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article