पंढरपूर पालिकेतील सत्ताकेंद्र उद्ध्वस्त करण्याची 25 वर्षांनी आली पुन्हा संधी:आ. राजू खरेंचे प्रतिपादन; अभिजीत पाटील, अनिल सावंत यांच्यासह आघाडीतून तयारी

1 day ago 1
माढा आणि मोहोळमध्ये प्रस्थापितांना पराभूत करून आम्ही निवडून आलो आहोत, त्यामुळे आगामी निवडणुकांत आता मागे हटायचे नाही. पंढरपूर नगरपरिषदेतील सत्ता केंद्र उद््ध्वस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे, २५ वर्षांपूर्वी राजश्री गंगेकर यांना नगराध्यक्षपद मिळवून दिले होते. तब्बल २५ वर्षांनी पुन्हा ही संधी चालून आली आहे. त्यावेळी आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते होतो, आता आमदार झालो आहोत, पंढरपूरकरांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही, असा विश्वास मोहोळचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूरच्या नागरिकांना दिला.अनिलनगरमधून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची ठिणगी पडली असून, माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील आणि मोहोळ मतदार संघातील आमदार राजू खरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्षा राजश्री गंगेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर भोसले आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी भैरवनाथ शुगरचे व्हॉ. चेअरमन अनिल सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article