मोफत हुरडा महोत्सवात रोज 400 कुटुंबीय घेतात आस्वाद:अक्कलकोटमध्ये शेतकरी प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी लावली पाच एकर ज्वारी
1 day ago
1
शिवारात आगटी पेटते. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने भारावलेले भक्त गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. मागील १६ वर्षांपासून जानेवारीमध्ये महिनाभर हुरडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात दररोज सुमारे ४०० कुटुंबीय आस्वाद घेतात. येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार हे दरवर्षी पाच एकर ज्वारी मोफत हुरड्यासाठी लावतात. तेथे साधारण महिनाभर हुरडा पार्टी चालते. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक भक्त येतात. डिसेंबर, जानेवारी महिन्यात हुरड्याचा हंगाम सुरू असतो. या वेळी स्वामी दर्शनाला आलेले भाविक मोफत हुरडा महोत्सवात सहभागी होतात. हजारो स्वामीभक्तांसह, नागरिक कुटुंबीयांसह लाभ घेत आहेत. यंदा हुरडा महोत्सवाचे १७ वे वर्ष असून, शनिवारी (दि. २५) हुरडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. महोत्सवानंतर राहिलेल्या ज्वारीचे बी व वाळलेल्या हुरड्याची रास करून नागरिकांना मोफत दिले जाते. सुरती, कुचकुची, नरीबाला, फुले, उत्तरा गुलबंडी आदी जातीचे हुरडा असतात. उद््घाटनप्रसंगी अभिनव शिवलिंग महास्वामीजी, बसवलिंग महास्वामी, डॉ. ईश्वरानंद स्वामी यांच्या सानिध्यात हुरडा महोत्सवाचे उद्घाटन झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण हंचाटे हे होते. ^सर्वच बाबतीत आर्थिक दृष्टिकोनातून पाहुन चालत नाही. निस्वार्थ भावनेने हुरडा खायला घातल्याने एक प्रकारचे मनाला शांती मिळते. दैव आर्शिवादाने सगळे सुरळीत आहे. प्रमोद पाटील , शेतकरी ^आज समाजात अनेक परोपकारी माणस भेटतात ते नेहमीच दुसर्यांच्या सुख दुखःत सामिल होऊन माणूसकीचे दर्शन पडवत असतात. पुढे येत असतात. अशा माणसांच्या पाठीमागेच ईश्वर आशीर्वाद असल्याचे मत भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येथे बोलताना व्यक्त केले. यामुळेच पाटील व बिराजदार परिवारांना एक प्रकारे समाधान मिळते. सचिन कल्याणशेट्टी, आमदार ^स्नेह बंधुभाव वाढावा या उद्देशाने गेल्या १६ वर्षापासुन हुरडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या १७ वे वर्षे असून, दररोज सुमारे ४०० ते ५०० कुटुंबीय लांबून येऊन महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी येतात. शिवराज बिराजदार , शेतकरी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)