हिंगोली (President Medal) : जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक आनंद मस्के यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने (President Medal) सन्मानित करण्यात आले.
सन १९९० मध्ये तत्कालिन परभणी जिल्हा पोलिस दलात भरती झालेले आनंद मस्के (Anand Muske) यांनी पोलिस दलामध्ये अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली. त्यामुळे त्यांना आतापर्यंत ३७८ पुरस्कार मिळाले. यासोबतच वरिष्ठ अधिकार्यांकडून ५ प्रशस्तीपत्र सन २०१८ मध्ये त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले. त्यांची (President Medal) राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली.
२६ जानेवारीला संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आनंद मस्के यांना राष्ट्रपती पदक (President Medal) बहाल केले. यावेळी खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल आदींची उपस्थिती होती.