माढा शहरासह परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी ५०० हून अधिक स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्याच्या उद्देशाने ऑइल मिलचा प्रकल्प उभारत असून, ऑक्टोबर महिन्याच्या आत तो पूर्णत्वास जाणार आहे. सोयाबिनसह त्याच्या उपपदार्थाची निर्मिती केली जाणार असून, ३०० टन प्रतिदिन उत्पादन क्षमता या मिलची असणार आहे, असे प्रतिपादन राजवी ऑइल मिलचे चेअरमन पृथ्वीराज सावंत यांनी केले. माढ्यात रोजगार निर्मितीसाठी सावंत परिवाराने नवा प्रकल्प उभा केला आहे. ऑइल मिल प्रकल्पाचे भूमिपूजन भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. माढा शेटफळ मार्गालगत १५ एकर क्षेत्रात ही ऑइल मिलचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले, माढ्याच्या विकासात व वैभवात भर पाडणाऱ्या उद्योगाला चालना देणारा प्रकल्प साकारत आहे. यावेळी सरपंच ऋतुराज सावंत, शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठे आदी उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)